वॉशिंग्टन : अमेरिकन सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी मोटोरोला Moto X ही लवकरच आपली पुढची आवृत्ती लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तयारी मोटोने केलेय. याबाबत कंपनीने तसे ट्वीट केलेय.
भारतातील हा नवा स्मार्टफोन २१ मेगाफिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. तसेच या मोबाईलची बॅटरी लाइफही वाढविण्यात आले आहे. ३० तास बॅटरी लाइफ असणार आहे. मोटोने ट्विट केल्यानंतर #XOMotoX हॅशटॅग ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये आहे.
मोटोने स्मार्टफोनचा फोटोही अपलोड केलाय. मोटोरोलाचा स्मार्टफोन बॅकपॅनल दाखविण्यात आला आहे. मोटो लवकरच भारतातही मोटो एक्स प्ले हॅन्डसेट लाँच करण्याची शक्यता आहे.
Tired of those hazy memories? Get hitched with a perfect partner with a 21MP rear camera. #XOMotoX pic.twitter.com/EacxxybKL2
— Motorola India (@MotorolaIndia) September 7, 2015
No more getting dumped by your phone. Your perfect partner is coming with 30 hours of battery backup. #XOMotoX pic.twitter.com/2dJp0C3viI
— Motorola India (@MotorolaIndia) September 6, 2015
मोटो एक्समध्ये काय असणार?
- ५.५. इंच फुल-एचडी, १०८० पिक्सल रेझ्युलेशन डिस्प्ले
- २१ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- १.७ GHz ६४ बिट ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर
- २ जीबी रॅम, हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वॉरिएंटमध्ये आहे. त्यात पहिला १६ जीबी आणि दुसरा ३२ जीबी. १२८ जीबी एसडी कार्ड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.