ईयर फोन वापराल, तर जेलमध्ये जाल...

२०११ मध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्याप्रकरणी ६,४६५ जणांवर कारवाई करण्यात आली. यंदा जून महिन्यापर्यंत ३,४७३ जणांवर अशी कारवाई करण्यात आली.

Updated: Jul 21, 2012, 04:08 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मोबाईल वापरणे या व्याख्येमध्ये कॉल करणे किंवा रिसीव्ह करणे, टेक्स, पिक्चर किंवा व्हॉईस ट्रान्समिट करणे हेसुद्धा गुन्हा मानण्यात आले आहे. हॅण्ड फ्रीसेटही वापरण्यास मनाई बहुतेक जण आपण हॅण्ड फ्रीसेट वापरत असल्याने आपणावर कारवाई करू नये अशी सबब सांगतात. परंतु हॅण्ड फ्रीसेट वापरणेही कायद्याने दंडास पात्र असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

२०११ मध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्याप्रकरणी ६,४६५ जणांवर कारवाई करण्यात आली. यंदा जून महिन्यापर्यंत ३,४७३ जणांवर अशी कारवाई करण्यात आली. या काळात सर्वाधिक मे (६८२ केस) आणि मार्च (६४५ केस) नोंदविण्यात आल्या. या ३.४७३ वाहनचालकांकडून ५,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

महाराष्ट्र मोटार वाहन कायदा, कलम २५० अ नुसार वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे कायद्याने दंडास पात्र आहे. परंतु यासाठी दंड केवळ १०० रुपये आकारण्यात येतो. हा दंड फार कमी असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. वाहन चालवताना मोबाईल फोन किंवा आयपॅड वापरल्यास यापुढे कमीत कमी ५०० रुपये दंड आकारण्यात यावा तसेच दुसरा गुन्हा केल्यास २००० ते ५००० दरम्यान दंडाची रक्कम वाढवत नेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.