तरूणांनो सावधान, पबवर पोलिसांचा डोळा

तरूणांनो पब आणि रेस्टोबारमध्ये मस्ती करण्यासाठी जाल तर खबरदारी घ्यावी लागेल. कारण आता पब आणि बारवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जुहू येथील भीषण अपघातानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आता पब, रेस्टोबारबाहेर मद्यपरवान्याची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 6, 2012, 09:36 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

तरूणांनो पब आणि रेस्टोबारमध्ये मस्ती करण्यासाठी जाल तर खबरदारी घ्यावी लागेल. कारण आता पब आणि बारवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जुहू येथील भीषण अपघातानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आता पब, रेस्टोबारबाहेर मद्यपरवान्याची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

पब आणि रेस्टोबारमध्ये  जाण्यासाठी परवाना नसलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच संबंधित बारवरही कारवाई केली जाणार आहे. याशिवाय मद्यपि चालकांविरुद्धची कारवाई अधिक कडक करण्याचे आदेशही वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दंगा करणाऱ्या तरूणांना स्व:तावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मुंबई अनेक  अपघात हे दारू ठोसून मस्तीत गाडी चालविल्यामुळे झाले आहेत. तर यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे पोलिसांना उशिरा शहाणपण सुचले आहे.

 

 

दरम्यान, जुहू अपघातात जखमी झालेल्या दोन्ही तरुणींची प्रकृती  चिंताजनक आहे. या अपघाताप्रकरणी राहुल मिश्रा या तरुणाला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली होती. त्याने मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले होते. इतकेच नव्हे तर गाडीत असलेल्या सर्वानी मद्यपान केले होते. त्यापैकी कोणाकडेच मद्याचा परवाना नव्हता. त्यामुळे या पाचही जणांवर तसेच बारवर कारवाई होणार आहे.

 


खार येथील कॉस्मिक रेस्टोबार हुक्का पार्लरवर छापा मारून पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हुक्का ओढणाऱ्या २३ जणांना अटक केली. यामध्ये  टीव्ही मालिकेत काम करणारी एक अभिनेत्रीही सापडली. परंतु, ती हुक्का ओढत नसल्यामुळे तिला घरी जाऊ देण्यात आले. तर  हॉटेलचा व्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांना  वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.