आर्टस् ग्रॅज्युएटसाठी रिक्रुटमेंट

प्रत्येक पालकांपुढं आणि विद्यार्थ्यांपुढं पदवीधर झाल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न सतावत असतो. त्यातच नोकरीचं शोधणही अवघड असतं. आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणं जिकरीचं झालं आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना (आर्टस् ग्रॅज्युएट) खिजवलं जातं की, यांना कोण नोकरी देणारं? मित्रानो घाबरू नका. तुम्हालाही नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे आणि होणार आहे.

Updated: Feb 15, 2012, 04:25 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

प्रत्येक पालकांपुढं आणि विद्यार्थ्यांपुढं पदवीधर झाल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न सतावत असतो. त्यातच नोकरीचं शोधणही अवघड असतं. आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणं जिकरीचं झालं आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना (आर्टस् ग्रॅज्युएट) खिजवलं जातं की, यांना कोण नोकरी देणारं?

 

 

मित्रानो घाबरू नका. तुम्हालाही नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे आणि होणार आहे. त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे तुमच्या हातात घसघशीत पगार पडू शकणार आहे. बीए, बीएमएस ग्रॅज्युएट्सनाही वर्षाकाठी मिळणा-या पॅकेजचा आकडा तब्बल १५ ते २० लाखांच्या घरात गेलाय. विशेष म्हणजे ग्लोबल क्रायसिस सुरू असूनही फायनान्शिअल कंपन्या एवढं पॅकेज देऊ करतायत. चला मग काय आहेत, त्या टिप्स् त्या आपण पाहू या.

 

 

प्रेझेंटेशन स्किल महत्त्वाचं

कंपन्या रिक्रुटमेंटसाठी येतात तेव्हा लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यूज घेतात. यात इंटरव्ह्यू देताना तुम्ही कसं स्वत:ला प्रेझेंट करता याला खूप महत्त्व आहे.

 

 

कोसेर्स स्किल हवं

अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोसेर्स आणि उपक्रम यांच्याकडेही कंपन्या खूप लक्ष देतात. यादृष्टीनं तुम्ही अभ्यास केला आणि थोडी मेहनत घेतली की झालं.

 

 

कंपन्यांचा कल कोठे आहे?

 

 

बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज या प्रोफेशनल कोर्ससाठी विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असतानाच कार्पोरेट आणि मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी बीएमएस ग्रॅज्युएट्स फेव्हरिट ठरू लागलेत. एचआर कॉलेजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्येही तब्बल २० लाखाचं पॅकेज मिळालं आहे.

 
सेंट झेवियर्स, एचआर कॉलेजांमध्ये नुकत्याच झालेल्या कॅम्पस रिक्रुटमेंटमधून बीए, बीएमएस ग्रॅज्युएट्सना थेट १२ ते २० लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. आर्टस्, कॉमर्स त्याबरोबरच मॅनेजमेंट स्टडीज् या स्ट्रीम्स सध्या या कंपन्यांमध्ये फेव्हरेट आहेत. आयटी कंपन्यांना मागे टाकत फायनान्शिअल तसंच कन्सल्टन्सी क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांनी कर्मचारी मिळवण्यासाठी डिग्री कॉलेजांकडे आपली पावलं वळवलीयंत. गेल्या वर्षीही झेवियर्स कॉलेजमधून बीए केलेल्या विद्यार्थ्यांना आठ-दहा लाखांची पॅकेजेस मिळाली होती. हाच ट्रेंड यावर्षीही पुन्हा एकदा दिसून येत आहे.

 

काय आहे कंपन्यांचा ट्रेंड

गेल्या काही वर्षांपासून कंपन्यांचा ट्रेंड खूप बदलला आहे. सायन्सपेक्षाही आर्टस्, कॉमर्स, मॅनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या संधी चालून येत आहेत. या विद्यार्थ्यांचं कॉलेज पातळीवरचं शिक्षण त्यांना कुठेही काम करताना उपयोगी पडेल. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यात कंपन्यांचाही मोठा फायदा असतो. यातून विद्यार्थ्यांनाही उत्तेजन मिळत आहे.

 

 

आतापर्यंत कोणत्या कॉलेजमधून किती जणांना फायदा झाला आहे ते आपण पाहू. यात (शाखाः कॉलेजः पॅकेज, प्रतिवर्षी लाखांमध्ये) बीएमएसः एचआरः २०, आर्टसः झेवियर्सः १२ , आर्टस्-कॉमर्सः मिठीबाईः ५.५ ,बीएमएसः केसीः ३.५ ,कॉम-बीएमएसः बिर्लाः ३.१२, आयटीः साठ्येः २.७ यांचा समावेश आहे.