मुंबई लोकलमध्ये महिलांचा गरबा डान्स

 मुंबईकरांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात, पण त्यांना वेळ फारच कमी पडतो.

Updated: Oct 20, 2015, 02:33 PM IST
मुंबई लोकलमध्ये महिलांचा गरबा डान्स title=

मुंबई : मुंबईकरांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात, पण त्यांना वेळ फारच कमी पडतो, आयुष्यातील बराच वेळ त्यांचा प्रवासात जातो, असं म्हटलं जातं.

मग प्रवासात का असेना, ज्या गोष्टी टाळता येत नाहीत, अथवा धकाधकीच्या जीवनात थोडाफार विरंगुळा महत्वाचा असतो.

या व्हिडीओत सर्वच महिलांनी निळ्या रंगाच्या साड्या आणि ड्रेस घातले आहेत, मुंबईत नवरात्रीत नऊ दिवसात, प्रत्येक दिवशी एक रंग ठरलेला असतो.

त्या दिवशी जवळ-जवळ ६० ते ७० टक्के महिला एकाच रंगाचे कपडे परिधान करून ऑफिसला निघतात. निळा रंग ज्या दिवशी ठरला होता, त्या दिवसाचा हा व्हिडीओ आहे.

पाहा, मुंबई लोकलमध्ये महिलांचा गरबा डान्स

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.