मुंबई : प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो असे म्हणतात. महिला या प्रत्येक पुरुषाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक पुरुषाच्या जीवनात येणाऱ्या त्या महत्त्वाच्या ९ महिला.
१. आई : आई ही पहिली महिला आहे ज्य़ामुळे तुम्ही या जगात येतात. जीच्यामुळे तुम्ही हे जग पाहता. या जगात तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारं कोण असेल तर ती असते तुमची आई.
२. बहीण : जी तुमच्याशी भांडते आणि रुसवाही दूर करते. जिच्या शिवाय तुमचे बालपण अपूर्ण असते ती महिला म्हणजे तुमची बहीण. सक्की नसली तरी आपण कोणाला तरी बहिण मानतोच.
३. प्रियसी : तुम्हाला प्रेमात पाडणारी आणि फक्त तिचाच विचार करणारी जर कोणती महिला असते तर ती म्हणजे प्रेयसी.
४. मैत्रिण : जी तुम्हाला खूप समजून घेते. जेव्हा तुम्हाला कोणतीही समस्या असते तेव्हा तुम्ही तुम्ही ज्या महिलेला प्रथम फोन करता ती असते तुमची मैत्रिण.
५. पत्नी : तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सुख-दुःखात साथ देणारी जर कोण असते तर ती म्हणजे पत्नी. स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करणारी असते पत्नी.
६. मुलगी : तिच्यासाठी तुमचे प्रेम कधीच कमी होत नाही. आयुष्यभर तुम्हाला जीची काळजी असते. ती म्हणजे तुमची मुलगी.
७. भावनाशी खेळणारी : तुम्हाला दुःख देवून सोडून जाणारी महिला प्रत्येकाच्या वाट्याला येते. तिच्या जाण्याने तुम्हाला सर्वाधिक दुख होतं.
८. स्वप्नातील परी : जिची नेहमी तुम्ही स्वप्नं पाहता ती तुमच्यासाठी गर्लफ्रेंडप्रमाणे असते, परंतू गर्लफ्रेंड होऊ शकत नाही. पण जी तुम्हाला जीवनातील सत्य स्वीकारण्यास शिकवते. ती स्वप्नातली महिला प्रत्येकाच्या जीवनात येते.
९. आजी : तुमचा आनंद हाच तिच्यासाठी सर्वकाही असतो. जी तुमची सतत काळजी घेते. तिला सर्वात प्रिय तुम्ही असतात ती महिला म्हणजे तुमची आजी.