बाळासाठी धोकादायक, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ उत्पादनावर बंदी

`जॉन्सन बेबी टॅल्कम पावडर` या लोकप्रिय बालप्रसाधन उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. प्रमाणाबाहेर आलेले जीवाणू कमी करण्यासाठी कॅन्सरप्रवण अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याने त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

Updated: Apr 24, 2013, 05:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
जॉन्सन बेबी टॅल्कम पावडर या लोकप्रिय बालप्रसाधन उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. प्रमाणाबाहेर आलेले जीवाणू कमी करण्यासाठी कॅन्सरप्रवण अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याने त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यांनी ही कारवाई केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सर्व उत्पादंनाचा रद्द करण्यात आला असून ही परवाना बंदी जूनपासून अंमलात आणली जाणार आहे. तोपर्यंत कंपनीला अपीलसाठी राज्य सरकारने मुभा दिली आहे.

तेल, साबण, शॅम्पूसारखी उत्पादने प्रसिद्ध असलेल्या जॉन्सन कंपनीवर महाराष्ट्र एफडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. या पावडरमध्ये जीवाणूंचे प्रमाण विहीत निकषांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी एथिलीन ऑक्साईडचे वापर करून निर्जंतुकीकरण केले. मात्र त्यांनी ही प्रक्रिया कॅन्सरप्रवण असल्याचे निर्दशनास आले आहे.