रत्नागिरी : मासिक पाळीसंदर्भात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यासाठीच कोकणातल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 'कळी उमलताना' हा नवा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.
मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र आजही मासिळ पाळीसंदर्भात व्हावी तितकी जनजागृती झालेली नाही. त्याचसंदर्भातला एक चांगला उपक्रम रत्नागिरीतल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी सुरू केला आहे. 'कळी उमलताना' या उपक्रमाअंतर्गत त्यांनी कोकणातल्या ग्रामीण भागात ल्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅमकिन्स वेण्डिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २५ पेक्षा जास्त शाळांमध्ये या मशिन्सचं वाटप करण्यात आले आहे. ५ रूपयांचं कॉईन या व्हेंडिंग मशीनमध्ये टाकावं लागते. शाळेतल्या शिक्षिका आणि पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केले आहे.
खरंतर ही सोय प्रत्येक रेल्वे स्टेशन, बस डेपो, कॉर्पोरेट ऑफिस, शाळा आणि कॉलेजेसमध्येही करणं गरजेचं आहे . कोकणातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा उपक्रम राबवणाऱ्या अनुपमा चाचे-जोगळेकर यांचा हा प्रयत्न नक्कीच चांगला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.