व्यायाम केल्यानं भूक वाढत नाही तर कमी होते!

व्यायाम केल्यानं भूक वाढते, असाच सर्वसामान्यांचा समज असतो… नाही का? पण याच समजाला छेद दिलाय एका नव्या अध्ययनानं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 21, 2012, 04:09 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
व्यायाम केल्यानं भूक वाढते, असाच सर्वसामान्यांचा समज असतो… नाही का? पण याच समजाला छेद दिलाय एका नव्या अध्ययनानं... या अध्ययनानुसार, जिमखान्यात अर्ध्या तासापेक्षा ज्यास्त वेळ तुम्ही जर घाम गाळलात तर तुमची भूक वाढत नाही तर कमी होते.
याचसंबंधी नुकतंच एक संशोधन करण्यात आलंय. या संशोधनाच्या निष्कर्षानुसार व्यायाम न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत सकाळी सकाळी त्या महिलांनी भूक कमी लागण्याचा अनुभव घेतला ज्यांनी ४५ मिनिटं ट्रेडमिलवर व्यायाम केला होता.
हा नवा अभ्यास नुकताच ‘मेन्स हेल्थ’ मध्ये प्रकाशित करण्यात आलाय. मेंन्सॅच्युएटस् युनिव्हर्सिटीमध्ये एनर्जी मेटोबोलिजिम लॅबचे डिरेक्टर बॅरी ब्रॉन यांनी ‘मेन्स हेल्थ’शी बोलताना व्यायामामुळे निश्चितच भूक कमी होत असल्याचा दावा केलाय.