`आप`च्या उमेदवारांना विकत घ्यायचा डाव

‘आम्हाला या गोष्टीची खात्री आहे की भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेस दिल्लीत ‘आप’च्या उमेदवारांना विकत घ्यायचा प्रयत्न करेल’

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 8, 2013, 01:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम आदमी पार्टीनं दिल्लीत पहिल्याच डावात जोरदार मुसंडी मारलीय. परंतु, ‘आम्हाला या गोष्टीची खात्री आहे की भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेस दिल्लीत ‘आप’च्या उमेदवारांना विकत घ्यायचा प्रयत्न करेल’ असं ‘आप’नं म्हटलंय.
आपचे वकील प्रशांत भूषण यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस आणि भाजपनं यापूर्वीही मतदारांना पैसे देऊ केले होते. मला याची खात्री आहे की, काँग्रेस आणि भाजप आमच्या उमेदवारांनाही खरेदी करण्याचा प्रयत्न करतील.
दुसरीकडे, भाजपनं ‘आप’च्या आरोपांना बाष्कळ बडबड करार दिलंय. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदावार हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, आप हा सत्तेतील गंभीर दावेदार नाही. भाजप आपल्या बळावरच दिल्लीत सरकार स्थापन करेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.