ठाणे, मुलुंड हद्दीतील टोल कधी बंद होणार?, भुजबळांचे आश्वासन

राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2014, 08:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.
. ठाणे जिल्हात आणि मुलुंडमध्ये एकूण १९ टोलनाके आहेत यामध्ये मुलुंड आनंद नगर, ऐरोली, खारेगाव, एलबीएस आणि घोडबंदर वरचे टोलनाके हे वर्दळीचे आहेत मुंबईहून पुणे, नाशिकला जाण्यासाठी हेच टोलनाके पार करावे लागतात. ऐरोलीवरून ठाण्याच्या दिशेने जायचं झाल्यास एरोली आणि आनंद नगर हे दोन्ही टोलनाके पार करावे लागतात. त्यामुळे दिवसाकाठी १२० रुपये देऊन प्रवास करावा लागतो. ठाणेकर या प्रवासाला चांगलेच वैतागलेत. त्यामुळे आधी ठाण्यातले टोल बंद करा, अशी त्यांची मागणी आहे.
राज्य सरकारच्या टोलबंदीच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या निर्णयाबद्दल आताच आनंद व्यक्त करणार नाही, असं राज ठाकरेंनी सर्वप्रथम `झी 24 तास`शी बोलताना सांगितलं. तर टोलवसुलीत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.