ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं आज सकाळी डोंबिवलीत निधन झालं. शंना यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. लेखक, नाटककार अशी त्यांची ओळख होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 25, 2013, 10:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं आज सकाळी डोंबिवलीत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. शंना यांचे वृद्धापकाळाने निधन झालं.
लेखक, नाटककार अशी त्यांची ओळख होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने काल सायंकाळी डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे त्यांच निधन झालं
त्यांचे शंकर नारायण नवरे हे सर्व महाराष्ट्राला परिचित होते. तरीही त्यांना शंना म्हणून ओळखले जायचे. कवडसे, शन्नाडे, झोपाळा, ऊन सावली, झोका हे त्यांचे ललित लेखसंग्रह अतिशय गाजले होते. तसंच त्यांची बरीच नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर गाजली.
त्यांनी सुरूवातीला डोंबिवलीत शिक्षकाची नोकरी केली होती. शं.ना. नवरे यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस आणि लोकप्रिय होतं... ते अतिशय शैलीदार वक्ते आणि माणसांमध्ये रमणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते... कादंबरी, कथा, ललित लेख नाटकं असं चौफेर लेखन त्यांनी केलंय. त्यांच्या लेखनातून बदलत्या शहरी समाज मनाचं चित्रण आपल्याला पहायला मिळतं. त्यांनी आपल्या लेखणीतून मध्यमवर्गीयांच्या सुखदु:खाचं चित्रण केलंय.
शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. २१ नोव्हेंबर १९२७ साली त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतल्या लोकल बोर्ड शाळेत तर माध्यमिक शिक्षण डोंबिवलीच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि दादरच्या किंग जॉर्ज शाळेत धालं. १९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.
१९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली... काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांची अनेक पुस्तके आणि नाटके गाजली आहेत. यामध्ये ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं गाजलीत तर ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘निवडुग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंबऱ्या गाजल्यात.
त्यांची साहित्य संपदा : मोरावर चोर - (संमिश्र) एकांकिका 200४, पर्वणी - करमणूकपर, विनोदी, रंगसावल्या - नाटक, तिळा उघड - कथासंग्रह, वर्षाव - नाटक, मला भेट हवी हो - नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, हसत हसत फसवुनी - नाटक

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

.