www.24taas.com, झी मीडिया, बोर्डी
बोर्डी रोड स्टेशनजवळील रेल्वे रुळावर बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास स्थानिकांना मृत अर्भक आढळले. मात्र या अर्भकाचे उंदीर घुशींनी लचके तोडले होते. या घटनेचा नागरिकांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय.
भटकी कुत्री सतत दोन दिवस अर्भकाच्या शरिराचे लचके तोडत असताना रेल्वे प्रशासनाचं मात्र त्याकडे लक्ष नव्हतं. बोर्डी रोड महाराष्ट्रातील शेवटचं स्थानक आहे.
बुधवारी पहाटेच्या सुमारास एक ते दोन दिवसाचं अर्भक फडक्यात गुंडाळून रेल्वे रुळानजिक ठेवलेलं स्थानिकांना आढळलं. अनेकांनी मोबाईलनं फोटो काढले. हे अर्भक दोन दिवसांपासून तिथंच पडलेलं होतं, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणापासून बोर्डी रेल्वेस्थानक फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.