दुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं

आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 14, 2013, 06:16 PM IST

www.24taas.com, आंगणेवाडी
आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. राज्याला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळावं, असं साकडं देवीला घातल्याचं ते म्हणाले.
भराडी देवी नवसाला पावते अशी तिची ख्याती असल्यामुळे अनेक भाविक नवस करण्यासाठी येतात. मात्र त्याचबरोबर अनेक राजकीय नेतेही या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. आणि नारायण राणे हे तर सिंधुदुर्गाचे भुमीपुत्र त्यामुळे दरवर्षी न चुकता ते ह्या जत्रेसाठी येतात. भराडी देवीच्या जत्रेचा उत्सव सलग तीन दिवस सुरू असतो. मुंबई, पुणे येथून अनेक भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात.

नारायण राणे यांनी महाराष्ट्रात असलेल्या भयंकर दुष्काळ लवकर जावा यासाठी नवस केला आहे. त्यांचा हा नवस पूर्ण होवो आणि महाराष्ट्रातील जनतेला लवकरच दिलासा मिळो.