कल्याणमध्ये गोरक्षा रॅली

गोहत्या रोखण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कल्याणात गोरक्षा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून मोटारसायकलवर निघालेल्या या रेलीमध्ये दोन्ही संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 4, 2013, 08:41 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, ठाणे
गोहत्या रोखण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कल्याणात गोरक्षा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून मोटारसायकलवर निघालेल्या या रेलीमध्ये दोन्ही संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
स्वामी समर्थ मठाचे मोडक महाराज यांच्या उपस्थितीत दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. दुर्गाडी चौकातून निघालेली ही रेली लाल चौकी, पारनाका, टिळक चौक, शिवाजी चौक, वल्लीपीर रोड, चक्कीनाका, मानपाडा रोडमार्गे खिडकाळी येथील शंकर मंदिर येथे विसर्जित करण्यात आली.
या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार, उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, बजरंग दलाचे कल्याण जिल्हामंत्री संजय शेंडे, संयोजक अर्जुन भाबड, धर्मप्रसार प्रमुख पराग तेली, कल्याण शहरमंत्री सौरभ पटवर्धन, सहमंत्री अभिषेक गोडबोले, अमोल जव्हेरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.