राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द मात्र दंड

२००८ सालच्या रेल्वे नोकर भरती वेळी परप्रांतियांना मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आलाय. याप्रकरणी कोर्टानं राज ठाकरे यांना दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी हजार रुपयांचा दंड ठोठावलाय.

Updated: Jun 7, 2014, 05:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
२००८ सालच्या रेल्वे नोकर भरती वेळी परप्रांतियांना मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आलाय. याप्रकरणी कोर्टानं राज ठाकरे यांना दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी हजार रुपयांचा दंड ठोठावलाय.
हा वॉरंट रद्द करुन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर हा अटक वॉरंट रद्द करण्यात आलाय. तसंच आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी राज ठाकरेंनी अर्जही केलाय. याप्रकरणाची पुढची सुनावणी ९ जुलैला होणार आहे.
2008 रेल्वे नोकरभरती परीक्षे दरम्यान परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाणी प्रकरणी राज ठाकरेंविरुद्ध तक्रार होती. राज ठाकरे याआधी सुनावणीसाठी अनेकदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात व़ॉरंट बजावण्यात आलं होतं. आता वॉरंट रद्द करुन घेण्यासाठी राज यांना व्यक्तीश: हजर रहावं लागलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.