मीरा-भाईंदरमध्य़े त्रिशंकू अवस्था, मनसे कोणासोबत?

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. भाजपनं २९ जागांच्या विजयासह आघाडी घेतली आहे.

Updated: Aug 13, 2012, 03:50 PM IST

www.24taas.com, मीरा-भाईंदर
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. भाजपनं २९ जागांच्या विजयासह आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या २४ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेनं १२ जागा तर काँग्रेसने २० जागांवर विजय मिळवला आहे. मनसेनेही खातं उघडलं असून ९ अ प्रभागातून मनसेचे अरविंद ठाकूर विजयी झालेत.
तर बहुजन विकास आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे विद्यमान महापौर तुलसीदास म्हात्रे यांचे चिरंजीव विकास म्हात्रे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांची कन्या असेनला मेंडोसा या २ अ आणि २१ अ अशा २ प्रभागांमधून निवडून आल्या आहेत.
निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत सर्व पक्षांचे गटनेते पराभूत झाले आहेत. काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांच्या बालेकिल्ल्याला धक्का लागला आहे. नमानगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.