www.24taas.com
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. भाजपनं १६ जागांच्या विजयासह आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या १४ जागा निवडून आल्या आहेत.
शिवसेनेने ८ जागा तर काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला आहे. मनसेनेही खातं उघडलं असून ९ अ प्रभागातून मनसेचे अरविंद ठाकूर विजयी झालेत.
काँग्रेसचे विद्यमान महापौर तुलसीदास म्हात्रे यांचे चिरंजीव विकास म्हात्रे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांची कन्या असेनला मेंडोसा २ अ आणि २१ अ अशा दोन प्रभागांमधून निवडून आल्यात. या निवडणुकीत सर्व पक्षांचे गटनेते पराभूत झालेत.