फूस लावून शाळकरी मुलीवर बलात्कार

रेल्वेच्या डब्यात आणि स्टेशन्सवर महिला सुरक्षित नसल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच काल डोंबिवली रेल्वे स्टेशनवर फर्स्ट क्लासमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या रोमियोला अटक केली होती.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 28, 2013, 09:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
रेल्वेच्या डब्यात आणि स्टेशन्सवर महिला सुरक्षित नसल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच काल डोंबिवली रेल्वे स्टेशनवर फर्स्ट क्लासमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या रोमियोला अटक केली होती.
आता कल्याण रेल्वे स्टेशनवर शाळकरी मुलीशी अनोळखी इसमाने फूस लावून तिला खडवली येथे नेवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कल्याणमध्ये आज अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. पीडित मुलगी काल शाळेत जाताना कल्याण स्टेशनवर मैत्रिणीची वाट बघत असताना एका अनोळखी तरुण सुफीयान शेख याने तिच्याशी लगट करत मैत्री केली आणि नंतर फूस लावत तिला खडवली येथे लॉजवर नेवून बलात्कार केला.
कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सुफीयान शेख ला डोंबिवलीहून अटक केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.