कल्याणमध्ये रॅगिंगचा बळी

रॅगिंगला कंटाळून नितीन पडवळकर या १९ वर्षीय मुलाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री विठ्ठलवाडी- उल्हासनगर रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली.

Updated: May 14, 2013, 06:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
रॅगिंगला कंटाळून नितीन पडवळकर या १९ वर्षीय मुलाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री विठ्ठलवाडी- उल्हासनगर रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली.
नेरूळमधील एका प्रतिष्ठीत अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नितीनने मित्रांना भेटायला जात आहे असे सांगून शुक्रवारी संध्याकाळी साधारण ६ वाजता घर सोडले. मात्र शुक्रवारी रात्री विठ्ठलवाडी ते उल्हासनगर या मार्गावर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. पोलीस तपासात त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. ‘दोन मित्रांनी माझे रॅगिंग केले आहे. त्यालाच कंटाळून मी आत्महत्या करत आहे.’ असे नितीनने त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

पत्रात लिहीलेल्या त्या दोन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान नितीनच्या बहिणीनेही गेल्या सहा महिन्यापासून त्याला दोन मित्रांकडून त्रास होत असल्याचे कबूल केले आहे. नितीन पडवळकर हा नवी मुंबईतील अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्यात वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील रहिवासी आहे. नितीनचे वडील कल्याण रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.