www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.
ठाण्यातल्या जव्हार-मोखाडा भागात ८४ बालकं कुपोषणानं दगावलीत तर शहापूर तालुक्यात ३७ बालकं दगावलीयत. मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातलं कुपोषणाचं हे भीषण वास्तव उघड झालंय. मात्र हे पाहून आरोग्य यंत्रणा काय करतेय असा प्रश्न उपस्थित होतोय.
जव्हार तालुक्यातल्या नादावली बंदराची वाडी या गावात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलंय. सरकारकडून कुपोषणावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र तरीदेखील याठिकाणी पोषक अन्न म्हणून देण्यात येणारं अन्न निष्कृष्ट आहार दिला जातो.
शासनानं चांगला दर्जाचा पोषक आहार द्यावा तसंच योग्य रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावक-यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.