आता, फेसबुकवरून चॅटींग बंद!

आत्ताआत्तापर्यंत शाळा-महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन दिसायचा तो बहुधा एकाच कारणासाठी... हे कारण, म्हणजे `फेसबुक चॅटींग`च्या माध्यमातून ते आपल्या मित्र-मैत्रिणींशी कनेक्टेड राहायचे... पण, हेच कारण आता फेसबुक त्यांच्यापासून हिरावून घेणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 18, 2014, 08:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आत्ताआत्तापर्यंत शाळा-महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन दिसायचा तो बहुधा एकाच कारणासाठी... हे कारण, म्हणजे `फेसबुक चॅटींग`च्या माध्यमातून ते आपल्या मित्र-मैत्रिणींशी कनेक्टेड राहायचे... पण, हेच कारण आता फेसबुक त्यांच्यापासून हिरावून घेणार आहे.
आता तुमच्या स्मार्टफोनवरून फेसबुक चॅटिंग तुम्हाला करता येणार नाही. ही सुविधा बंद करण्याचा निर्णय फेसबुकनं घेतलाय. पण, फेसबुकचे मोबाईल अॅप वापरणाऱ्या सर्वांसाठी चॅटिंग करण्यासाठी फेसबुक एक नविन मेसेंजर अॅप तयार करणार आहे. तसेच, ज्यांना फेसबुकवरून अशाच पद्धतीने संदेश पाठवायचे किंवा स्वीकारायचे असतील त्यांना फेसबुकचे हे नवे मेसेंजर अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुक आघाडीवर आहे. यामुळेच दिवसातून एकदातरी ऑनलाईन गेल्याशिवाय युजर्सना चैन पडत नाही. स्मार्टफोनमुळे फेसबुक अॅक्सेस करणे युजर्सना अगदी सोपे झाले आहे. मात्र, फेसबुक पुढील दोन आठवड्यांमध्ये आपली स्मार्टफोनवरील अॅपमधून आपली चॅटिंगची सुविधा काढून टाकणार आहे.
हा बदल प्रथमतः ब्रिटन, फ्रान्स आणि स्कँडिनिव्हियन देशांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, अमेरिकेसह उर्वरित जगभरात त्यानंतर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अॅपल आणि अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणारे युजर्स ही सुविधा वापरू शकतील.
हे अॅप सर्व ग्राहकांना आवडेल असा विश्वास फेसबुकनं व्यक्त केलाय. तर, सध्या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्स अॅप, वी चॅट यांसारख्या मेसेंजर अॅप्सना टक्कर देण्यासाठी फेसबुक हे नविन अॅप आणणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.