महाराष्ट्रातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीत उपोषण

महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 23, 2012, 10:06 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.
महाराष्ट्रातील 16 कॉलेजेसमधील वर्ष 2011-12 च्या आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना आयुषनं परीक्षा देण्याची परवानगी नाकारलीय. कॉलेज आणि आयुषमधील वादात हे विद्यार्थी भरडले जात आहेत. 23 नोव्हेंबरला परीक्षा आहे पण गेले दोन महिने हे विद्यार्थी परीक्षा देण्याची परवानगी मिळावी म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांना भेटून विनंती करतायेत. अनेकांना भेटूनही त्यांनी निव्वळ आश्वासनांशिवाय काहीही केलेलं नाही. आपलं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हीच विद्यार्थ्यांची इच्छा आहे.
या विद्यार्थ्यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाब नबी आझाद यांची भेट घेण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनी भेट नाकारली त्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय.