www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
खुशखबर... खुशखबर... खुशखबर... स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट प्रेमींनो, जर का तुम्ही चांगल्या स्मार्टफोन कमीत कमी किंमतीत घेण्यासाठी थांबला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... बाजारात स्मार्टफोनच्या किंमतीत चांगलीच घसरण झालीय. काही प्रॉडक्ट तर चक्क अर्ध्या किंमतीत उपलब्ध झालेत.
`गॅलेक्सी एस ४`
कोरिया कंपनी सॅमसंगनं `गॅलेक्सी एस ४` या फोनची किंमत तर जबरदस्त कमी केलीय. एस ४ फोनमध्ये ओक्टा कोर एक्जीनस प्रोसेसर, २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज, १३ एमपी रियर कॅमेरा आहे. गॅलेक्सी एस ४ ची किंमत अगोदर ४१,५०० रुपये होती जी कमी करुन आता २८,००० रुपये झालीय.
`गॅलेक्सी नोट टू`
तसंच सॅमसंगनं स्मार्टफोन `गॅलेक्सी नोट टू` फोनच्या किंमतीतसुद्धा घट केलीय. कंपनीनं या फोनची किंमत ३९,९०० रुपयांवरून २८,००० रुपये केली. फोनचा स्क्रीन ५ इंच आहे. गॅलेक्सी नोट टू फोनमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. ८ एमपी कॅमेरा असून बॅटरी ३१०० एमएएच आहे जी जास्त वेळ टिकू शकते.
आयपॅड मिनी
अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी अॅप्पलच्या आयपॅड मिनी (१६ जीबी) फोनची किंमत २१,९०० रुपयांवरुन १६,९९९ रुपयांवर घसरलीय. या फोनमध्ये आधुनिक ओएस ७ आहे. फोनची डिजाईनसुद्धा अप्रतिम आहे.
`गुगल नेक्सस ७`
`गुगल नेक्सस ७` हा फोनही चांगलाच स्वस्त झालाय. याची किंमत १९,९९० रुपयांवरुन कमी करुन १०,९९९ रुपयांवर आलीय. गुगल नेक्सस ७ फोन टचस्क्रीन आणि एनविडिया टेगरा ३ प्रोसेसर आहे. यामध्ये १ जीबी रॅम असून, तुम्ही १० तास फोनवर बोलू शकता.
`एलजी जी २`
कोरिया कंपनी `एलजी जी २` जेव्हा बाजारात आला तेव्हा त्याची किंमत ४१,५०० रुपये होती. मात्र, आता ही किंमत कमी करुन ३२,००० हजारावर आणलीय. फोनची स्क्रीन ५.२ इंच फूल एचडी आहे. यामध्ये क्वाड कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०० प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज आहे.
`लेनोवो के ९००`
चिनी कंपनीने `लेनोवो के ९००` या फोनच्या किंमतीत तर चांगलीच घट केलीय. के ९०० फोनची किंमत अगोदर ३२,००० रुपये होती आणि आता २१,००० रुपये झालीय. यामध्ये २ जीएचजेड इंटेल ऐटॉम प्रोसेसर आहे. १३ एमपी कॅमेरा आणि ड्युयल एलईडी फ्लॅश आहे. के ९०० फोन आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन आहे.
`एफएचडी एमआय ५२५`
`स्पाईस`चा स्मार्टफोन `एफएचडी एमआय ५२५` फोनची किंमत कमी झालीय. फोन लाँन्चिगच्यावेळी किंमत १९,९९० रुपये होती. आता ९,९९९ रुपये केलीय. एफएचडी एमआय ५२५ फोनमध्ये १.५ जीजेड क्वाड कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज, ड्युयल कॅमेरा आणि अन्य सॉफ्टवेअर आहेत.
`ब्लॅकबेरी झेड १०`
मात्र, किंमतीत सर्वांत जास्त घट कॅनडाची कंपनी `ब्लॅकबेरी`नं केलीय. `ब्लॅकबेरी झेड १०` मध्ये ही घट पाहायला मिळतेय. या फोनची किंमत अगोदर ४३,९९० रुपये होती. मात्र, हाच फोन आता १७,९९० रुपयांत उपलब्ध झालाय. हा फोन नवीन ओएसवर आधारित आहे. ब्लॅकबेरीची स्क्रीन ४.२ इंच एचडी टचस्क्रीन आहे. ब्लॅकबेरी झेड १० मध्ये तुम्ही अँन्ड्रॉईड अॅपसुद्धा डाऊनलोडही करु शकता. याशिवाय ब्लॅकबेरी झेड १० मध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.