स्मार्ट वॉलपेपर्सपासून घरच्या घरी वीजनिर्मिती

लंडन : घराच्या भिंतींना लावलेल्या वॉलपेपर्सने वीज तयार करुन तुमच्या घरातील उपकरणे चालवली तर, आश्चर्य वाटेल ना?

Updated: Mar 1, 2016, 12:56 PM IST
स्मार्ट वॉलपेपर्सपासून घरच्या घरी वीजनिर्मिती title=
सौजन्य - ससे विद्यापीठ

लंडन : घराच्या भिंतींना लावलेल्या वॉलपेपर्सने वीज तयार करुन तुमच्या घरातील उपकरणे चालवली तर, आश्चर्य वाटेल ना? पण, आता हे शक्य होणार आहे. घरातून वाया जाणारा प्रकाश आणि उष्णता यांच्या आधारे आता घरात वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.

फुलपाखरांच्या डोळ्यांवरुन प्रेरणा घेऊन इंग्लंडधील ससे विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अत्यंत पातळ स्वरुपाच्या ग्राफेनच्या पट्ट्या तयार केल्या आहेत ज्यांचा वापर भविष्यात वॉलपेपरमध्येही केला जाऊ शकतो.

'नॅनोटेक्स्चरिंग' असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. यातील ग्राफेनच्या पट्ट्या प्रकाशाचे शोषण करतात आणि त्यातून ऊर्जा निर्मिती करतात. फुलपाखरांच्या डोळ्यात अशाप्रकारची रचना असते ज्यामुळे त्यांना कमीत कमी प्रकाशातही पाहता येते. या प्रकारचे तंत्रज्ञान वापरल्याने प्रकाश परावर्तीत होत नाही. त्यामुळे माणसाच्या डोळ्यांनाही त्याचा त्रास होत नाही.

अशाप्रकारे केलेल्या वीजनिर्मितीमुळे भविष्यात घरातील अनेक वस्तूंना वीज पुरवता येईल. ज्या वस्तूंच्या वापरासाराठी कमी वीज लागते त्यासाठी अशा प्रकारे वीज तयार करता येईल.