गुगल डूडलवर दिग्दर्शक सत्यजित रे

जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जयंती निमित्त गुगलनं त्यांना डूडल-ट्रीब्युट दिलाय. होम पेजवर रे यांच्या प्रसिद्ध सिनेमाचा एक सीन स्केचच्या स्वरुपात चितारण्यात आलाय.

Updated: May 2, 2013, 12:01 PM IST

www.24taas.com, मुंबई
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जयंती निमित्त गुगलनं त्यांना डूडल-ट्रीब्युट दिलाय. होम पेजवर रे यांच्या प्रसिद्ध सिनेमाचा एक सीन स्केचच्या स्वरुपात चितारण्यात आलाय... पाथेर पांचाली या रे यांच्या गाजलेल्या सिनेमातील दुर्गा आणि अप्पू यांचा सिनेमातल्या सीन डूडलवर दिसतोय.
२ मे १९२१ साली सत्यजित रे यांचा जन्म झाला. भारतीय सिनेमा जगभरात पोहचवणारा द्रष्टा दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती... पाथेर पांचाली, अपराजीतो, अपूर संसार, चारुलता यांनी चित्रपट क्षेत्राला नवी परिभाषा दिली. सत्यजित रे यांना ३२ राष्ट्रीय पुरस्कार तर ऑस्करच्या जीवन गौरव पुरस्कारनानं सन्मानित करण्यात आलंय.
भारतीय सिनेमाची शंभरी साजरी करत असताना जगभरातील सत्यजित रे यांच्या चाहत्यांकडून गुगल डूडलनी दिलेली अनोखी श्रद्धांजली म्हणावी लागेल....