www.24taas.com, झी मीडिया, पुणे
भारतीय कंपनी इंटेक्सनं टेक्नॉलॉजीनं प्लॅटिनम सीरिजचे फोन बाजारात आणले आहेत. प्लॅटिनम कर्व, प्लॅटिनम मिनी, आणि प्लॅटिनम ए६. कंपनीच्या मते हे फोन खूप स्टायलिश असून त्यांची किंमत अवघ्या दोन हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.
स्वस्त फोन ज्यांना घ्यायचाय त्यांच्यासाठी हे फोन खूप चांगले आहेत. आधुनिक आणि आकर्षक असे फिचर्स असलेले हे फोन तीन वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. यात ६० केबीपासून १४५ केबीपर्यंत इनबिल्ट मेमरी आहे. तसंच या फोनचे कॅमेरे खूप चांगले असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
प्लॅटिनम कर्वचं डिझाईन नावानुसार वक्राकार आहे. हा शॅम्पेन, कॉफी, ब्लूसारख्या अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात फेसबुक सुद्धा उपलब्ध आहे. वक्राकार ए६ पातळ मेटॅलिक डिझाईनवाला फोन आहे आणि त्याच्या मागील भागात लेदर कव्हर आहे. त्यामुळं त्याचा लूक खूप सुंदर झालाय. त्यात बुक मेमरी सुद्धा आहे. शिवाय एफएम रेडिओ, टॉर्च आणि इतर सुविधाही त्यात आहे. त्याची बॅटरी १४०० एमएएचची आहे जी बराच टॉकटाईम देते.
प्लॅटिनम मिनी ड्युएल सिम फोनमध्ये ब्राइट आणि क्लीअर स्क्रीन आहे जी २ दोन इंच इतकी आहे. यात टीएफटी टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलाय. त्याची मेमरी १६ जीबीपर्यंत वाढवता येते. यात १.३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याशिवाय यात टॉर्च लाईट, ऑटो कॉल रेकॉर्ड बुक आणि अनेक प्रकराचे खेळ पण आहेत. यात एफएम रेडिओ पण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.