तयार झालाय ‘रोबोट`चा मेंदू

आज्ञा मानणारे (फॉलोअर) ‘रोबोट’ आपल्याला माहितीयेत. मात्र आता ‘रोबोट` स्वतः विचार करू शकणार आहेत. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने ‘रोबोट`साठी ही नवी प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे.

Updated: Sep 30, 2013, 01:12 PM IST

www.24taas.com, पीटीआय, वॉशिंग्टन
आज्ञा मानणारे (फॉलोअर) ‘रोबोट’ आपल्याला माहितीयेत. मात्र आता ‘रोबोट` स्वतः विचार करू शकणार आहेत. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने ‘रोबोट`साठी ही नवी प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीमुळे ‘रोबोट` कोणत्याही अडचणीवर स्वतः विचार करू शकणार आहे. एखादी बाब शिकून, ती आत्मसात करून कोणत्याही निरीक्षणाशिवाय कृतीत उतरविणे ‘रोबोट`ना शक्या होणार आहे. ही प्रणाली ‘रोबोट`साठी मेंदूच ठरणार आहे!
मिसौरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉकलॉजीतील शास्त्रज्ञ डॉ. जगन्नाथन सारंगपाणी यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. ‘रोबोट`ना दिलेले काम पूर्ण करताना चुका शोधून त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.
या प्रतिसाद प्रणालीमुळे आज्ञा मानणाऱ्या (फॉलोअर) "रोबोट`ला स्वतः पुढाकार घेऊन कृती करणाऱ्या (लीडर) "रोबोट`ची जागा घेता येईल. "रोबोट` त्याला दिलेले काम करताना समस्या निर्माण होऊन त्याच्या कृतीत बदल करण्याची गरज पडल्यास, ही प्रणाली कार्यान्वित होईल.
एकंदरीतच, ‘रोबोट`ला पुढच्या पायरीवर नेऊन ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. काही दिवसांनंतर स्वतःहून काम करणारे ‘रोबोट` अस्तित्वात असतील, असे सारंगपाणी यांनी सांगितले.
या प्रणालीचा उपयोग कसा होईल हे सांगताना सारंगपाणी म्हणाले, "कल्पना करा, तुम्ही एका ऑफिसमध्ये बसून दूर अंतरावरील बुलडोझरचे नियंत्रण करीत आहात. आणि बुलडोझरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित होईल आणि थांबलेले काम सुरू राहील.”
या संशोधनाचा उपयोग ‘रोबोट`द्वारा केली जाणारी टेहळणी, खाणकाम आणि हवाई क्षेत्रात करता येईल, असेही सारंगपाणी सांगतात. हवेत उडत असातना हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास हेलिकॉप्टर तातडीने उतरविण्यास ही प्रणाली उपयोगी ठरेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.