www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणून ओळखली जाणारी ‘अमेझॉन’ जगातील सर्वात पहिला थ्री डी डिस्प्ले स्मार्टफोन आज लॉन्च करणार आहे.
मीडियानं दिलेल्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या एका यू ट्यूब व्हिडिओमध्ये अमेझॉनच्या या स्मार्टफोनची एक झलक दाखवण्यात आलीय. हा फोन 18 जून रोजी वॉशिंग्टन डीसीच्या सिएटलमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
हा नवा स्मार्टफोन दिसण्यासाठी आकर्षक असेल आणि याचे चारही कॅमेरे थ्रीडी फोटो उपलब्ध करू शकतील. अमेझॉनच्या साईटवर दिसणाऱ्या या व्हिडिओमध्ये काही लोक थ्रीडी कॅमेऱ्यासोबत प्रयोग करताना दिसत आहेत.
या थ्रीडी टेक्निकसहीत स्मार्टफोनमध्ये मानचित्र आणि होम स्क्रीन फोटोला थ्रीडी रुपात बघता येऊ शकतं, असं वेबसाईटवर म्हटलंय.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.