पश्चिम आणि मध्य रेल्वेत मेगा भरती

रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन पदांसाठी ही भरती होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 23, 2014, 08:51 AM IST

www.24taas..com, झी मीडिया, मुंबई
रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन पदांसाठी ही भरती होत आहे.
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेत अनेक रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन पदांसाठी ए-४ आकाराच्या ८० जीएसएम बाँड कागदाची केवळ एक बाजू वापरून विहीत नमुन्यातअर्ज मागविण्यात आले आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
पूर्ण भरलेला अर्ज सामान्य टपालाद्वारे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, मुंबई यांच्याकडे १७ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पाठवावेत. तसेच अर्ज आरआरबी कार्यालयांच्या जागेत ठेवलेल्या पेटीत सुद्धा टाकता येतील. टपालाने अर्ज प्राप्तीची अंतिम तारीख ४ मार्च २०१४ रोजी ५.३० वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.