मुंबई : अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्या अनेक कंपन्या दर आठवड्याला नवीन स्मार्टफोट बाजारात आणत असतात. तुमच्या अँड्राइड आणि अॅपल स्मार्टफोनमध्ये इतके फिचर असतात की तुम्ही त्याचा पूर्ण वापर केल्याविनाच 1 ते 2 वर्षात नवीन स्मार्टफोन विकत घेतात. जुना स्मार्टफोन विकण्यास काढला तरी त्याला तुम्हाला हवी तशी चांगली किंमत मिळत नाही. मग तो जुना स्मार्टफोन तुम्ही कोणाला देऊन टाकता किंवा तो घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात पडलेला असतो.
पण जर तुम्ही गाडीत गाणे ऐकण्याचे शौकीन असाल तर काही म्युझिक आणि त्याच्याशी संबधीत सॉफ्टवेअर डाऊनलोड करून तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा चांगला वापर तुम्ही करू शकतात.
जर तुम्हाला जीपीएससाठी आयफोनचा वापर करायचा असेल तर आणि तो लँडस्केप मोडमध्ये पाहू इच्छिता तर तुम्हाला http://moreinfo.thebigboss.org/moreinfo/depiction.php?file=sbrotator4Data या साईटवर जावून SBRotator हा अॅप डाऊनलोड करावा लागेल. जर तुम्हाला जुना स्मार्टफोन यासाठीच वापरायचा असेल तर (https://play.google.com/store/apps/details?id=nl.fameit.rotate&hl=en) गूगल प्ले स्टोअरवरूनही अल्टीमेट रोटेशन कंट्रोल हा अॅप तुम्ही डाऊनलोड करू शकतात.
जुन्या स्मार्टफोनला गाडीमध्ये ठेऊन तुम्ही गाणी ऐकू शकतात किंवा जीपीएस सिग्नलच्या माध्यमातून तुम्ही रस्त्याचीही माहिती घेऊ शकतात. जुन्या स्मार्टफोनला डेटा कनेक्टीव्हिटी हवी असेल तर तुमच्या दुसऱ्या स्मार्टफोनसोबत त्याला कनेक्ट करून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.