रात्रीही उत्तम फोटो काढणारा `ओप्पो आर-1`

ओप्पो मोबाईल्सनं एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणलाय. या मोबाईलचं वैशिष्ट्यं म्हणजे रात्रीसुद्धा तुम्ही या मोबाईलच्या साहाय्यानं खूप चांगले फोटो काढू शकता. ओप्पो आर-1 हा एक प्रीमियम मोबाईल म्हणूनही ओळखला जातोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 2, 2014, 11:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ओप्पो मोबाईल्सनं एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणलाय. या मोबाईलचं वैशिष्ट्यं म्हणजे रात्रीसुद्धा तुम्ही या मोबाईलच्या साहाय्यानं खूप चांगले फोटो काढू शकता. ओप्पो आर-1 हा एक प्रीमियम मोबाईल म्हणूनही ओळखला जातोय.
ओप्पो आर-1 1.3 गिगाहर्टझ क्वाड कोअर प्रोसेसरवर चालतो. याची जाडी आहे 7.1 मिलीमीटर तर या फोनचं वजन आहे 141 ग्रॅम... या मोबाईलचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 8 मेगापिक्सलचा नाईट शूट कॅमेरा आहे जो प्युअर इमेज टेक्नोलॉजीवरवर आधारीत आहे. त्यामुळेच कमी प्रकाशातही फोटोचा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. अँन्ड्रॉईड वर आधारित कलर ऑपरेटींग सिस्टमवर हा फोन चालतो. या फोनचा रॅम एक जीबी आहे तर यामध्ये 16 जीबीची स्टोरेज क्षमता आहे. परंतु, या स्मार्टफोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड टाकण्याची सुविधा मात्र दिलेली नाही.
या फोनची टचस्क्रीन 5 इंचाची आहे. 1280 X 720 पिक्सलचं रिझोल्युशन यात आहे. कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनची सुविधा यात आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला फारसा अपाय होणार नाही.
या फोनचा मागच्या बाजुचा कॅमेरा 8 मेगापिक्सल रिझोल्युशनचा आहे. यामध्ये BSI CMOS सेन्सरचा वापर करण्यात आलाय. चांगलं आऊटपूट मिळावं यासाठी यामध्ये प्युअर इमेज टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे हा कॅमेरा दिवसा आणि रात्रीही चांगले फोटो काढू शकतो. याच्या पुढच्या बाजुचा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे जो सेल्फी काढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
या मोबाईलची खासियत म्हणजे, यामध्ये F2.0 अपर्चर, 80 वाईड अँगल, कमी प्रकाशात फोटो काढण्यासाठी नाईट मोड, बर्स्ट शूटसारख्या सुविधा दिल्या गेल्या. यामध्ये ब्लू ग्लास फिल्टरही आहे जो इन्फ्रारेड लाईटला कमी करतो आणि फोटोंत ‘रेड आय’ न येण्याची काळजी घेतो. यामुळे तुम्हाला रात्रीही चांगले फोटो काढता येतील. यामध्ये, लाईट, एक्सीलोमीटर, मॅग्नेटिक आणि प्रॉक्सिमीटी सेन्सर, थ्रीजी, ब्लूटूथ 2.1, वाय-फाय आणि जीपीएस सपोर्टही देण्यात आलाय.
ओप्पो आर-1 मध्ये 2410 एमएएचची बॅटरी आहे त्यामुळे तुम्हाला टॉकटाईमही चांगला मिळतो. या मोबाईलची किंमत आहे 26,990 रुपये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.