www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एमबीए संदर्भात तंत्र शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय. यंदा एमबीए प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरवह्यू रद्द करण्यात आलेत. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या हा महत्वाचा निर्णय़ मानला जातोय.
थेट मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा मार्ग म्हणजे एमबीए...राज्यभरातून लाखो विद्यार्थी एमबीएसाठी प्रवेश परीक्षा देत असतात. त्यांचा कस लागतो तो ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये.. आता मात्र, एमबीएला प्रवेश घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यू गरजेचा नाही. तंत्रशिक्षण विभागानं यावर्षीपासून प्रवेश प्रक्रियेतून हे दोन्ही टप्पे काढून टाकलेत. त्यामुळे एमबीएचा प्रवेश सुकर होणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतील, तसंच भ्रष्टाचारालालाही आळा बसू शकेल. मात्र, यामुळे गुणवत्तेचा दर्जा खालावण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.
बिझनेस मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू आवश्यक आहे की नाही, याबाबत मतमतांतरं आहेत, पण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.