www.24taas.com,झी मीडिया,गुडगाव
जपानची निसानया कार कंपनी डॅटसन या कारला नव्या रुपात नव्या ढंगात सोमवारपासून बाजारात आणतेय. अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डॅटसन ब्रँड ची हॅचबॅक कार ‘डॅटसन गो’ ची किंमत चार लाख रुपयापेक्षा कमी असेल.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे निसान कंपनी साधारण तीन दशकानंतर या ब्रँडला पुन्हा एकदा बाजारात आणतेय. भारतीय बाजारात ही कार पुढच्या वर्षी दाखल होईल.
‘आज आम्ही इतिहासाचा एक नवा अध्याय सुरु करतोय. डॅटसन परत येतेय. इंडोनेशिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय बाजारात पुढच्या वर्षापासून या कारची विक्री सुरु होईल. कंपनीचा विक्रीदर वाढवण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे भारतीय बाजारात ‘डॅटसन’ला सादर करणं’. असं निसान मोटार कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्लोस घोसन म्हणालेत.
सध्या भारतीय कार बाजारात आमची भागीदारी फक्त १.२ टक्केच आहे मात्र २०१६ पर्यंत आम्हाला ही टक्केवारी १० टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे. आम्हाला आशा आहे की डॅटसन हे लक्ष्य पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. अशीही माहिती कार्लोस यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.