यापुढे सर्टिफिकेटवर true copy तून सुटका

आता नोकरीसाठी किंवा अन्य कामांसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर (सर्टिफिकेट) सत्यप्रत (अटेस्टेड) म्हणून उल्लेख नसला तरी चालू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तशा सूचना केल्या आहेत. यापुढे सर्टिफिकेटवर true copy ची गरज भासणार नाही. मात्र, स्वत: केलेले अटेस्टेड आवश्यक राहणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 12:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता नोकरीसाठी किंवा अन्य कामांसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर (सर्टिफिकेट) सत्यप्रत (अटेस्टेड) म्हणून उल्लेख नसला तरी चालू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याबाबत तशा सूचना केल्या आहेत. यापुढे सर्टिफिकेटवर true copy ची गरज भासणार नाही. मात्र, स्वत: केलेले अटेस्टेड आवश्यक राहणार आहे.
तुम्ही नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी जी काही प्रमाणपत्र द्याल, त्यासाठी आवश्यक असणारी सत्यप्रतीची गरज भासणार नाही. यातून तुमची सुटका होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सर्व सचिवांना सूचना केल्या आहेत. यापुढे सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर स्वत: अटेस्टेशन ग्राह्य धरले जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी आवश्यक असणारा अर्ज हा लहान, सुटसुटीत आणि साधा असावा, अशाही सूचना केल्या आहेत. ज्यामुळे अर्ज भरताना कोणताही त्रास तरुणांना होता कामा नये, असे सूचना देताना बजावले आहे.
सर्टिफिकेटवर अटेस्टे करताना अनेक समस्या निर्माण होतात. तरुणांची ससेहोलपट होते. त्यामुळे सर्वच कठीण होऊन बसते. त्यामुळे सगळ्यांनाच कागदपत्रे संभाळताना अडचण होते. त्यामुळे मोदी यांनी सूचना करताच सरकारी विभाग तात्काळ कामाला लागले आहेत. यामुळे तरुणांची अडचण दूर होणार आहे. याआधी भाजपप्रणीत राज्य सरकारने याची अंमलबजावणी सुरु केली आहे. यात गोवा आणि गुजरातचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.