फ्लिपकार्टवर लीक झाला मोटो जी (जेन 3) स्मार्टफोन

ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर थोड्या वेळासाठी मोटो जी (जेन 3)चे स्पेसिफिकेशन्स लीक केले गेले. पण नंतर लगेच साईटवरून काढूनही टाकण्यात आलं.

Updated: Jul 27, 2015, 05:10 PM IST
फ्लिपकार्टवर लीक झाला मोटो जी (जेन 3) स्मार्टफोन title=

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर थोड्या वेळासाठी मोटो जी (जेन 3)चे स्पेसिफिकेशन्स लीक केले गेले. पण नंतर लगेच साईटवरून काढूनही टाकण्यात आलं.

वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत 11,999 दाखवत होती तर त्याच्या फिचर्समध्ये 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचा संदर्भ केलेला होता. 
या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5 इंच असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे. 
या नवीन मोटो जी (जेन 3) मध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा तसंच ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. यूजर्स 32 जीबी पर्यंतचे मेमरी कार्डही या फोनमध्ये वापरू शकतात.
याव्यतिरिक्त 2470 एमएएच बॅटरी असेल तर 1.4 GHz क्वाडकोर प्रोसेसर असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.