आता मोबाईलवर फ्री सर्व्हीस

आपण मोबाईल वापरत आहात, तर तुम्हाला मोफत काय काय मिळेल, याची माहिती नसेल तर...हे तुमच्यासाठी. मोबाईल वापर ही आजची गरज बनली आहे. मोबाईलमुळे आपल्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सोपा उपाय आहे. मोफत अॅप्समुळे ते शक्य झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2013, 02:05 PM IST

www.24taas.com
आपण मोबाईल वापरत आहात, तर तुम्हाला मोफत काय काय मिळेल, याची माहिती नसेल तर...हे तुमच्यासाठी. मोबाईल वापर ही आजची गरज बनली आहे. मोबाईलमुळे आपल्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सोपा उपाय आहे. मोफत अॅप्समुळे ते शक्य झाले आहे.
मोबाईलच्या स्पर्धेमुळे एक पैसा कॉलचं गणित सुरू झालं. त्यामुळे एसएमएस महाग वाटू लागला. आधी मोफत एसएमएस पाठिविण्यासाठी मेसेच पॅक मारावा लागत होता. तर काही कंपन्यांनी त्या कंपनीच्या मोबाईलसाठी कमी पैसे आकारण्यास सुरूवात केली. तर ग्रुप मोबाईलमध्ये फोन कॉल्स मोफत केलं. मात्र, त्यासाठी बिलिंग प्लॅन घ्यावा, अशी अट असते.
आता फोन कॉल, व्हिडीओ कॉल्स, एसएमएस या सर्वांमुळे आपले मोबाईलचे वाढत असलेल्या बिलाचे आकडे कमी करण्यासाठी फोन स्मार्ट उपाय ठरत आहेत अँड्रॉइड किंवा आयओएसवर चालणाऱ्या अॅप्सची त्यासाठी मदत होईल. बिल वाचविणारे काही अॅप्स.

टॉकअटोन
तुमच्या फोनची डेटा कॉस्ट वाचविण्यासाठी टॉकअटोन हे अॅप्स महत्वाचे आहे. केवळ अँड्रॉइड आणि आयओएस डिवायइसवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून मोफत व्हॉइस कॉल्स आणि मेसेजेस पाठवता येतात फेसबुक किंवा गुगल चॅटही करू शकतो.
स्कायपे
स्कायपे हे अॅप बहुतांश स्मार्टफोन यूजर्स वापरतच असतील. हे अॅप मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्हीकडे वापरता येऊ शकते. या अॅप्सवर फ्री व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकतो. यावरून आपल्याला फोन्स किंवा व्हिडीओ कॉल्स करायचे असतील तर आपल्या मित्रांचे किंवा कुटुंबीयांचे अकाऊंट त्यात अॅड करून घ्यावे लागते. यानंतर आपण त्या व्यक्तींना एक रुपयाही खर्च न करता फोन तसंच व्हिडीओ कॉलिंग करू शकतो. आपण फोटोही शेअर करू शकतो.
निंबूझ
या अॅपवरून आपण मोफत चॅटिंगही करू शकतो. निंबूझ अॅप आता कम्प्युटर, स्मार्टफोन आणि फिचर फोन यामध्ये वापरू शकतो. निंबूझ ते निंबूझ यूजरसोबत आपण व्हॉइस कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्स करता येतात. कम्प्युटर, अँड्रॉइड, आयओएस आणि सिंबियन या ऑपरेटिंग सिस्टिमवरून आपण वॉइस कॉल्स तर आयओएस आणि कम्प्युटरवरून मोफथ व्हिडीओ कॉल्स करू शकतो.
ओवू
ओवूच्या माध्यमातून आपण ग्रुप व्हिडीओ चॅट करताना एकावेळी १२ जणांशी गप्पा मारू शकतो. हे अॅप आपल्याला स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे. याचबरोबर आपण या माध्यमातून फेसबुक फ्रेंडस ‌आणि ट्विटरच्या फॉलवर्सशी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करण्यासाठी खूप उपयोगी आहे. शिवाय चॅटिंगही करता येते.

वुई चॅट
वुई चॅटच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंगची आणि व्हॉइस चॅटची सुविधा मिळते. यातून व्हॉइस कॉलिंग करता येते शिवाय व्हॉइस मेसेजेस पाठवता येतो. ग्रुप टेक्स्ट चॅट्स , मल्टिमीडिया शेअरिंग आणि ब्राऊजर्सच्या माध्यमातून बोलू शकतो. `लूक अराऊंड` नावाचं एक फिचर असून याच्या माध्यमातून वूई चॅट यूजर शोधून त्याच्याशीही आपण चॅटिंग करू शकतो.
फ्रिंग
स्कायपेशी साधर्म्य साधारणारे हे अॅप्स फेमस आहे. अँड्रॉइड, आयओएस आणि सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते. व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकतो. हे कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही फ्रिंग असणे गरजेचे आहे. चॅट बरोबर तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टही शेअर करता येऊ शकते. तसंच ग्रुप व्हिडीओची संधी आहे.
वायबर
व्हॉट्स अॅपशी जवळीक साधणारे हे अॅप्लिकेशन. हे अॅप डाऊनलोड केल्यावर आपल्या कॉन्टॅक्टबुकमधील नंबर्स सिंक करतो. यात तुमच्या कॉटॅक्ट बुकमधील जी व्यक्ती वायबर वापरत असेल त्या व्यक्तीशी तुम्ही कनेक्ट होतात आणि त्याच्याशी तुम्ही चॅटिंग , व्हॉइस कॉलिंग , व्हिडीओ कॉलिंग करू शकता.
फेस टाइम
अॅपलच्या सर्व डिवायसेसवर वापरता येईल हे अॅप्लिकेशन आहे. व्हिडीओ कॉल्स करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व अॅप्समध्ये हे अॅप वापरण्यासाठी सर्वात सोपे आहे. यासाठी तुमच्याकडे दुसऱ्या व्यक्तीचा अॅपलचा आयडी किंवा फोननंबर असणे गरजेचे आहे. एका क्लिकवर व्हिडीओ कॉलिंग होऊ शकते. आयओएस आणि आयमॅकवर आपण हे अॅप सहज वापर करता येतो.

गपशप
मोफत एसएमएस पाठविण्यासाठी या अॅपचा होतो. प