www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल कंपनी ‘झोलो’नं आपल्या मोबाईलच्या ताफ्यात आणखी एका नव्या ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोनचा समावेश केलाय. या स्मार्टफोनचं नाव ‘Q900T’ असं आहे.
या फोनचे फिचर्स पाहता हा एक स्वस्त आणि मस्त फोन असल्याचं दिसतंय. हा ड्युएल सिम डॅन्डसेट एमटी 6589 टर्बो क्वाड कोअरवर चालतो. यामध्ये 1.5 जीएचझेड क्वाड कोअर मीडिया टेक एमटी 6580 चिपसेट बसवण्यात आलीय. याला व्हीआर एसजीएक्स 544 जीपीयूचा सपोर्ट दिला गेलाय.
या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, हा फोन कर्व्ह म्हणजेच गोलाकार डिझाईन असलेला आहे. यात ‘एज टू एज ग्लास टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आलाय.
कंपनीनं याआधी सादर केलेल्या Q900 या फोनची ही नवीन आवृत्ती आहे. परंतु, हा फोन जुन्या फोनपेक्षा खूप स्वस्त आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन 4.7 इंचाची आहे. यामध्ये चांगल्या व्ह्यूसाठी आयपीएस एचडी 2.5 डी कर्व्ह डिस्प्ले आहे. यामद्ये, अँन्ड्रॉईड 4.3 ऑपरेटींग सिस्टम वापरण्यात आलंय.
या मोबाईलमध्ये 1 जीबी रॅम आहे तसंच यात 4 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. मेमरी कार्डच्या साहाय्यानं 32 जीबी पर्यंत ही मेमरी वाढविता येऊ शकते. यामध्ये एलईडी फ्लॅशसहीत 8 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये बीएसआय सेन्सरही आहे. तर व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढच्या बाजुला 2 मेगापिक्सलचा कॅमेराही उपलब्ध आहे.
थ्रीजी, टूजी, वाय-फाय, ब्लूटूथ 3.0, जीपीएस अशा सुविधाही यामध्ये आहे. यामध्ये 1800 मेगाहर्टझची बॅटरी आहे. केवळ चार तासांत ही बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते. आणि सलग 10 तासांचा टॉकटाईम तुम्हाला मिळू शकतो. एव्हढंच नाही तर तुम्ही हेडसेट लावून सलग 60 तासांपर्यंत म्युझिकही या फोनच्या साहाय्यानं ऐकू शकता. या फोनची किंमत आहे 11,999 रुपये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.