www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्या इंटरनेट बँकेच्या व्यवहारावर कोणाची तरी नजर आहे. म्हणून तुम्ही जर घाबरत असाल तर, आता घाबरण्याची काहीच गरज नाही.
कारण बॅंकिंग कोड्स अॅण्ड स्टँन्डर्ड बोर्ड ऑफ इंडिया (BCSBI) ने एक नवीन सुरक्षायंत्रणा आणली आहे.
ती सुरक्षायंत्रणा म्हणजे गुप्त कोड. ज्या कोडद्वारे आपल्याला अनधिकृत व्यवहार सुरक्षित करता येणार आहे. BCSBI कंपनी बँकेच्या नव्या योजना ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं काम करते.
अशाच या नव्या योजनेत जर बँक अकाउन्ट अनधिकृत युझर अपग्रेड करत आहे, अशी तक्रार ग्राहक करत असतील. तर बँक ग्राहकांच्या सहमतीशिवाय अकाउन्ट अपग्रेड करणार नाही.
तसेच ग्राहकांना बँक अकाउन्ट अपग्रेड करण्याचे एसएमएस बँकेला करावे लागणार नाही. बँक अकाउन्ट अपग्रेड करण्यासाठी ग्राहकांकडून लेखी स्वरुपात लिहून घेईल.
इंटरनेट बँकिंग व्यवहारादरम्यान जर सुरक्षायंत्रणेमध्ये काही अडचण आली. सुरक्षा यंत्रणेतील अडचणीमुळे युझरच काही नुकसान झालं, तर त्याची नुकसान भरपाई बँक देईल.
मात्र जर युझरने स्वत: गुप्तकोड दुसऱ्या व्यक्तीला दिला. जर त्याचा गैरवापर करण्यात आला, तर युजरलाच त्याची नुकसान भरपाई भरावी लागेल. ही माहिती BCSBI चे चेअरमन ए.सी. महाजन यांनी दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.