iball चा सुंदर आणि स्वस्त स्मार्टफोन

भारतीय कंपनी iballने क्वॉड कोअरवर चालणारा नवा हँडसेट अँडी ४.५ पी ग्लिटर बाजारात आणला आहे. ड्युअल सीमवाला या हँडसेटची किंमत ७४०० रुपये आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 11, 2014, 08:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय कंपनी iballने क्वॉड कोअरवर चालणारा नवा हँडसेट अँडी ४.५ पी ग्लिटर बाजारात आणला आहे. ड्युअल सीमवाला या हँडसेटची किंमत ७४०० रुपये आहेत.
पाहू या काय आहेत याची वैशिष्ट्ये...

- या फोनमध्ये 1.3 जीएचजेड क्वाड कोर प्रॉसेसर आहे.
- हा फोन अँड्रॉइड 4.2.2 आधारित फोन आहे.
- यात 512 एमबी रॅम आणि 4 जीआईजीएस इंटरनल स्टोरेज आहे.
- जास्त स्टोअरेजसाठी यात 32 जीबी एक्सटर्नल कार्ड आहे.
- याचा स्क्रीन 4.5 इंच आहे. रिझल्यूशन 854x 480 पिक्सल आहे.
- अँडी 4.5 ग्लिटरला एक फ्रंट कॅमरा आहे.
- यात व्हिडियो रिकॉर्डिंग होऊ शकते.
- मागील बाजूस 8 मेगापिक्सलचा कॅमरा आहे. यात फ्लॅशही आहे.
- या शिवाय या फोनमध्ये 3जी (21एमबीपीएस), 2जी, ब्लूटूथ 4.0, हॉटस्पॉट वाय-फाय,
- एफएम रेडियो आणि जीपीएसही आहे. यात 1450 एमएएच की बॅटरी आहे.
- पिवळ्या रंगात याचा लूक खूप आकर्षक है.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.