www.24taas.com, मुंबई
अॅपलचा बहुचर्चित आयफोन 5 आज भारतात दाखल झाला. अमेरिका-युरोपमध्ये झालेल्या भव्य स्वागतानंतर आता त्याचं भारतात लाँचिंग झालं. आयफोन 5 आजपासून भारतात मिळणार असला, तरी त्याचं ऑनलाईन आणि मोबाईल स्टोअर्समधलं बुकिंग आधीच सुरू झालंय. या स्मार्टफोनबाबत भारतीय मोबाईल प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे...
अमेरिकेत २१ सप्टेंबर रोजी आयफोन - ५ लॉन्च करण्यात आला होता. परंतु या फोनच्या मागणी येवढा पुरवठा अमेरिकेत देखील होऊ शकलेला नाही. भारतातही आयफोन-५चे बुकिंग केल्यानंतर फोन मिळण्यासाठी एक आठवड्याची वाट पहावी लागणार आहे.
अॅपल आयफोन-५
- ४ एस`पेक्षा मोठी स्क्रीन
- ७.५ मिलिमीटर रुंदी
- ११२ ग्रॅम वजन
- नॅनो सीम कार्ड. ४ आणि ४ एसपेक्षा ४० टक्के छोटे सीमकार्ड
- ४ इंच टचस्क्रीन;
- ११३६ * ६४० रिझोल्युशन
- ४ जी एलटीई नेटवर्क चालू शकेल
- ८ मेगापिक्से०ल एचडी कॅमेरा
भारतात आयफोन-५ ची किंमत
- १६ जीबी : ४४ हजार ५००
- ३२ जीबी : ५२ हजार ५००
- ६२ जीबी : ५९ हजार ५००