www.24taas.com, वॉशिंग्टन
फेसबुकने साऱ्या जगभर आपलं जाळं पसरलं आहे.... आपल्या खास फिचर्सने साऱ्यानांच मोहिनी घालणाऱ्या या फेसबुकने जेव्हा सुरवात केली तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, फेसबुकची भरारी एवढी मोठी असेल ते. मात्र तुम्हांला माहिते का... पुण्याच्या मुलगी ही पहिलीवहिली फेसबुकची कर्मचारी होती. आणि तिच्या बौद्धिक गुणांवर खूश होऊन फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने तिला आपल्या कंपनीत स्थानही दिलं होतं. आणि त्या संधीचं तिने सोनंही केलं.0
फेसबुकच्या नवीन ऑफिससाठी जेव्हा मार्क झुकरबर्ग कर्मचारी ठेवत होता तेव्हा एक मुलगी मुलाखत द्यायला गेली होती व तिच्या हुशारीने भारावून गेलेल्या झुकरबर्गने तिला कामावरही ठेवले.
फेसबुकच्या कार्यालयात पहिली महिला इंजिनीअर ठरलेल्या या मुलीचं नाव आहे ‘रुचि सिंघवी’. रुचि ही मूळची पुण्याची मुलगी. फेसबुकवरील ‘न्युज फिड’ या सर्वात हिट फिचरची आयडिया रुचि सिंघवीची होती.