www.24taas.com , झी मीडिया , नवी दिल्ली,
टू -व्हीलर निर्मीतीमधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या दुचाकीचं कंस्पेट मॉडल नुकतंच लॉन्च केलं. हा प्रयोग यशस्वी झाला तर दुचाकी निर्मिती व्यवसायाची दिशाच बदलून जाईल.
आरएनटी प्रकल्पाद्वारे लिक्विड कूल्ड टर्बो चार्ज्ड डिझेल १५० सी सी बाइकवर या आधीच संशोधन सुरू होते. नवीन बाइक चालवण्याचा अनुभव म्हणजे एक मोठ्या एसयूव्ही कार चालवण्यासारखा आहे.
हिरो मोटोकॉर्पचे व्यवस्थापकिय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांच्या दाव्यानुसार, या मोटरसायकलवर फ्लॅट लोडींग सरफेस, मल्टि युज फोल्डींग साइड रॅक्स, आरामशीर सीट आणि स्पेशियस फुटबोर्ड या पूर्वी कोणत्याही दुचाकीमध्ये नव्हते. या बाइकमध्ये हाय टॉर्क १५० सी सी डिझेल इंजीन ऑप्शनल टर्बोचार्जर सह आहे.
खराब रस्त्यांवर या बाइकंच वैशिष्ट्य असं की, पहिल्या चाकाला हब इलेक्ट्रीक मोटर आहे. ज्यामुळे चालवणाऱ्याला आरामदायी फिल येइल. यामध्ये रिअर ड्राइव बंद करून केवळ फ्रंट व्हील ड्राइववर चालवणे देखील शक्य आहे.
या बाइकमध्ये पावरटेक-ऑफ शॉफ्ट पण आहे. ज्याचा वापर करून जनरेटर, वॉटर पंप एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेता येणे शक्य आहे. ऑप्शनल एलईडी ल्रॅम्प वेगळा करून प्रकाशासाठी वापरता येऊ शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.