गुगल नोज- सर्च करणारं गुगलच नाक!

गुगलने नुकतचं एक नवीन टूल बाजारात लाँच केलयं. ‘गुगल नोज’ अस त्या टूलचं नाव असून हे नवीन टूल शास्त्रज्ञांसाठी चर्चेचा विषय ठरल आहे. हे टूल आज म्हणजे २५ डिसेंबरला लाँच झालं. गुगल नोज हे गुगल सर्च इंजिनचाच एक भाग आहे.

Updated: Apr 1, 2013, 05:33 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गुगलने नुकतचं एक नवीन टूल बाजारात लाँच केलयं. ‘गुगल नोज’ अस त्या टूलचं नाव असून हे नवीन टूल शास्त्रज्ञांसाठी चर्चेचा विषय ठरल आहे. हे टूल आज म्हणजे २५ डिसेंबरला लाँच झालं. गुगल नोज हे गुगल सर्च इंजिनचाच एक भाग आहे
तंत्रज्ञानामध्ये नवीन शोध लावण्यात गुगल नेहमीच अग्रगण्य मानलं जातं. त्याचप्रकारे गुगलने गुगल नोजचा शोध लावून इंटरनेट विश्वात आपल एक नवीन स्थान निर्माण केलयं. या नवीन टूल बद्दल साऱ्या जगभर चर्चा रंगली असून भारतात हे टूल लाँच होण्यासाठी थोडी वाट बघावी लागणर आहे.

आता गुगल युजर्स टच आणि टाईपच्या पलीकडे जाऊन गुगल नोज या टूलचा वापर करू शकतात. या टूलद्वारे आपण वासाद्वारे सर्च करू शकाल. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वासांमुळे आपण नव-नवीन सर्च करू शकता. भारतात या टूलबद्दल शास्त्रज्ञ शोध लावत आहेत.
एप्रिल फूलच्या निमित्ताने झी २४तास कडून त्यांच्या वाचकांना ही खास भेट. असा काही प्रकार नाही आहे.....