सॅमसंगने गॅलेक्सी एस 4 च्या किंमतीत मोठी कपात

स्मार्टफोन बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन भारतीय बाजारात नंबर एक असणाऱ्या सॅमसंगने आपले, दोन सर्वोत्कृष्ट फोन गॅलेक्सी एस-4, आणि गॅलेक्सी एस-4 मिनीच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

Updated: May 21, 2014, 07:53 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्मार्टफोन बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन भारतीय बाजारात नंबर एक असणाऱ्या सॅमसंगने आपले, दोन सर्वोत्कृष्ट फोन गॅलेक्सी एस-4, आणि गॅलेक्सी एस-4 मिनीच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर किंमतींची घोषणा केली आहे. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशयल वेबसाईटनुसार ऑनलाईन स्टोरवर गॅलेक्सी एस 4 ची नवी किंमत 31 हजार 814 रूपये आहे, या आधी या फोनची किंमत 40 हजार 500 रूपये होती.
म्हणजेच कंपनीने फोनच्या किंमतीत 8 हजार 686 रूपयांची कपात केली आहे. या आधी ही किंमत 23 हजार 360 होती.

गॅलक्सी एस-4 ची वैशिष्ट्यं...
प्रोसेसर- 1.6 गिगाहर्टझ क्वाड + 1.2 गिगाहर्टझ क्वाड
रैम- 2 जीबी
अँड्रॉईड - 4.2.2 जेली बीन
स्क्रीईन साइज- 5 इंच
रिझोल्युइशन- फूल एचडी, 1920 x 1080 पिक्सल
कॅमेरा- 13 मेगापिक्सल रिअर, 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
व्हिडिओ रेकॉर्डिंग - 1920 x 1080, 30 fps
मेमरी - 16 जीबी इंटरनल, 64 जीबी एक्स्पान्डेबल

गॅलक्सी एस-4 मिनीची वैशिष्ट्यं...
प्रोसेसर – ड्युएल कोअर 1.7 गिगाहर्टझ
रॅम- 1.5 जीबी
अँन्ड्रॉईड - 4.2.2 जेली बीन
स्क्रीरन साइज- 4.27 इंच
कॅमेरा- 8 मेगापिक्सल रीअर, 1.9 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
मेमरी - 8 जीबी इंटरनल, 64 जीबी एक्स्पान्डेबल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.