इयत्ता चौथीतल्या मुलीला मिळाली डॉक्टरेट पदवी

तामिळनाडूच्या कोयम्बतूर शहरातील नऊ वर्षांच्या मुलीला ब्रिटेनच्या वर्ल्ड रेकॉर्डस युनिवर्सिटीकडून डॉक्टरेटची मानद पदवीसाठी देऊन सन्मानित करण्यात आलं.

Updated: Mar 30, 2014, 07:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोयम्बतूर
तामिळनाडूच्या कोयम्बतूर शहरातील नऊ वर्षांच्या मुलीला ब्रिटेनच्या वर्ल्ड रेकॉर्डस युनिवर्सिटीकडून डॉक्टरेटची मानद पदवीसाठी देऊन सन्मानित करण्यात आलं.
या मुलीला ही डिग्री लॅपटॉपचे सर्व भाग वेगाने वेगवेगळे करून, नंतर एकत्र जोडण्यासाठी म्हणजेच असेंबल करण्यासाठी देण्यात आली.
आयटी सोल्यूशन फर्म चालवणाऱ्या प्रभु महालिंगाम यांच्या माहितीनुसार त्यांची मुलगी पी आदर्शिनीला रेकॉर्ड तोडण्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.
आदर्शिनी कोयलपलयम चौथ्या इयत्तेत शिकते. तिला व्हियतनाम हो ची मिन्ह या शहरात डॉक्टरेटची डिग्री देऊन सन्मानित करण्यात आलं.
आदर्शिनीचे वडील म्हणतात, त्यांची मुलगीने यापूर्वी तामिळनाडू बुक ऑफ रेकॉर्डस, इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डसही जिंकला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.