www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फेसबुकवर आपले फोटो आकर्षक वाटावेत यासाठी चेहऱ्याची सर्जरी करून घेण्याचं प्रमाण वाढू लागल्याचं दिसून आलं आहे. आपल्या नाकावरून किंवा गालांवरून कुणी वाईट कमेंट दिल्यामुळे अनेक जणांनी आपलं फेसलिफ्टिंग किंवा चेहऱ्याची सर्जरी केली आहे.
या संदर्भात कॉस्मेटिक सर्जन म्हणतात, की आपल्या आकर्षक दिसण्याबद्दल तरुण- तरुणी संवेदनशील असतात. मात्र फेस,बुकवर आपले फोटो पाहून कुणीतरी आपल्याशी मैत्री करावी, यासाठी त्यांनी आपल्या चेहऱ्याची सर्जरी करणं ही गोष्ट नवीन आहे. सोशल मीडियावरून ऑनलाइन डेटिंगचं प्रमाण वाढू लागलं आहे. आपल्या फोटोवरून वा वेबकॅमवरून आपल्याशी बोलणाऱ्या व्यक्तीवर आपली छाप पडावी, यासाठी आपल्या चेहऱ्याची सर्जरी करण्यासाठीही तरुण-तरुणी तयार असतात.
ही कॉस्मेटिक सर्जरी ‘फेसबुक फेसलिफ्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. ही सर्जरी करून घेणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यात मुलींपेक्षा मुलांचं प्रमाण जास्त आहे. नाकाची, गालांची सर्जरी करण्यासोबतच आपली त्वचा गोरी व्हावी, यासाठी ‘केमिकल पिलिंग’ घेत असल्याचं एका विद्यार्थिनीने कबुल केलं. माझा सर्जरीनंतरचा फोटो पाहून मला येणाऱ्या मुलांच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये वाढ झाली. माझ्या दिसण्याचं सगळे खूप कौतुक करतात. मला त्यामुले बरं वाटतं. फेसबुकववरील फोटो पाहून अनेक जणांना मॉडेलिंग, अभिनय याच्या ऑफर्स येतात. त्यामुळे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यापूर्वी चेहरा बदलण्याचं प्रमाण वाढतंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.