तुमच्या फेसबुक अकाऊंटचाही विमा शक्य!

फेसबुक आणि ट्विटरवरील अकाउंटचाही आता विमा काढणे शक्य होणार आहे. ब्रिटनच्या एका विमा कंपनीने अकाउंट हॅक झाल्यास त्यामुळे कराव्या लागणा-या अडचणींपासून लोकांना वाचवण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 12, 2012, 07:48 AM IST

www.24taas.com, लंडन
फेसबुक आणि ट्विटरवरील अकाऊंटचाही आता विमा काढणे शक्य होणार आहे. ब्रिटनच्या एका विमा कंपनीने अकाऊंट हॅक झाल्यास त्यामुळे कराव्या लागणा-या अडचणींपासून लोकांना वाचवण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. दि इन्फार्मेशन प्रायव्हसी नावाच्या या कंपनीने ही माहिती दिली. कंपनी विशेषत: हॅकिंगमुळे प्रतिष्ठेचे झालेले नुकसान, अकाऊंट हॅकिंग व आयडी चोरीच्या विरोधात अलाओ नावाचा विमा उपलब्ध करून देईल.
कंपनीचे सीईओ बेसिनी यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या विम्याची कदाचित गरज नव्हती, परंतु आता परिस्थिती बदलली आहे.
आज इंटरनेटचा वापर करणारी कुठलीही व्यक्ती सायबर गुन्ह्याचा शिकार होऊ शकते. त्यामुळे त्याच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचते.
लंडनमध्ये असा असेल विमा
कंपनी 3.99 पाऊंड (350 रुपये) मासिक रक्कम घेईल. यात ग्राहकास कायदेशीर सल्ला मिळेल. तुमचे खाते सायबर गुन्हेगारीचे शिकार झालेली असेल तर त्याला मदत केली जाईल. सोबतच तुमचा खासगी डाटा आॅनलाइन पद्धतीने अवैधरीत्या कुणी वापरत असेल त्याबाबत ग्राहकास संदेश पाठवून अॅलर्ट करेल.