असुरक्षित ऑनलाईन कॅश ट्रान्सफरच्या धोक्यापासून सावधान

५०० आणि १००० च्या नोटबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर कॅश ट्रान्सफर करण्यासाठी लोक पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक अशा ऑनलाईन कॅश ट्रान्सफरचा वापर करत आहेत. 

Updated: Nov 21, 2016, 04:19 PM IST
असुरक्षित ऑनलाईन कॅश ट्रान्सफरच्या धोक्यापासून सावधान title=

  नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या नोटबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर कॅश ट्रान्सफर करण्यासाठी लोक पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक अशा ऑनलाईन कॅश ट्रान्सफरचा वापर करत आहेत. परंतु हॅकर्सच्या माध्यमातून          कोणत्याही क्षणी आपले ऑनलाईन अकांऊट हॅक होऊ शकते.

आपला स्मार्टफोनचे सॅाफ्टवेयर अपडेट नसेल तसेच इंटरनेट स्लो असेल तर हॅकर्ससाठी आपण सॅाफ्ट टार्गेट आहोत. म्हणजेच जेवढा स्मार्टफोन जुना तितका धोका जास्त असतो. कॅश ट्रान्सफर करताना यूआरएल बॅाक्समध्ये एचटीटीपीस बरोबरच उजव्या बाजूला 'लॅाक आयकन' असेल तर ती वेबसाईट सुरक्षित आहे... आणि जर नसेल तर अशा वेबसाईटवरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन धोकादायक ठरू शकतं. 

कॅश ट्रान्सफर केल्यानंतर लगेच ब्राऊजरमधील कॅश ट्रान्सफर हिस्ट्री क्लियर करा, जर आपली ट्रान्सफर कॅश हिस्ट्री स्मार्टफोनमध्ये सेव्ह असेल, तर आपल्या कॅश संदर्भातील माहिती हॅकर्सला लगेच उपलब्ध होईल.

ऑनलाईन कॅश ट्रान्सफर करताना डिजिटल सर्टिफिकेशनवर लक्ष ठेवा. verising सारखी डिजिटल सर्विस वेबसाइटला सुरक्षित ठेवते. ब्राउजरमधील यूआरएलच्या उजव्या साईटला लॅाकचा लोगो असतो, त्यामुळे एखाद्या  साइटची डुब्लिकेट साइट बनवता येत नाही. जर तो लोगो नसेल तर ती डुब्लिकेट वेबसाईट असू शकते.

वेळोवेळी आपल्या इंटरनेट ब्राउजरला अपडेट करा, कारण इंटरनेट ब्राउजर प्रत्येकवेळी आपल्याला नवनवीन सिक्युरिटी वर्जन देत असतात. असे करत असल्यास  हॅकर्सपासून वाचू शकता.

कॅश ट्रान्सफर करत असताना अनेकवेळा आकर्षित पॅापअप मॅसेज सतत येत असतात, आपली इच्छा नसताना पण आपण त्यावर क्लिक करतो, परंतु त्यामुळे आपली कॅश ट्रान्सफर माहिती हॅकर्सपर्यंत पोचू शकते.

स्मार्टफोनला प्रत्येकवेळी लॅाक करत जा असे करत नसल्यास आपण हॅकर्सच्या जाळ्यात येऊ शकतो. कारण अकाऊंट हॅक करणारा व्यक्ती आपल्या ओळखीचाही असू शकतो.