अॅपलनं भारतात जूना 8 जीबी आयफोन-4 रिलॉन्च केलाय. भारतात या फोनची किंमत २२ हजार ९०० रुपये आहे. सॅमसंगला फाईट देण्यासाठी अॅपलने हा उपदव्याप केल्याचं म्हटलं जात आहे.
मात्र भारतीय ग्राहकांना असा जूना फोन, नव्याने आणि जास्तच जास्त किमतीत विकणं अॅपलला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण जगभरात आऊटडेटेड म्हणून ओळख असलेले आयफोनचे काही मॉडेल्स, अॅपलाल भारतात विकायचे आहेत की काय?, असं यावरून दिसून येतंय.
हा फोन भारतात २०१० साली लाँच करण्यात आला होता, त्यावेळी या फोनची किंमत २६ हजार रूपये होती. आता तो २२ हजार ९०० रूपयांना विकला जात आहे.
गुगलवर सर्च केलं तर दिसून येतं, अनेकांनी हा फोन जर भारतात अॅपलला विकायचा असेल, तर तो कमीत कमी १५ हजार रूपयांपर्यंत विकायला हवा, असं सूचवलं होतं.
मात्र अॅपल आणि कमी किंमत हे दोन विरोधाभास असल्याने, अॅपल असं काही करेल असं वाटत नसल्याचं जाणकारांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
अॅपल २०१० साली विकत असलेला फोन २०१० साली विकत घेणं किती शहाणपणाचं आहे. कारण स्मार्ट फोनच्या बाजारात एवढ्या पैशांत डझनभर नवीन सुविधा देणारे फोन आले आहेत.
झटपट बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपण सावध पावलं टाकतोय, असं अॅपलला वाटत असलं, तरी ही पावलं सावध टाकलेली नाहीत, तर उशीरा टाकलेली आहेत, आणि तंत्रज्ञानाच्या युगात उशीरा टाकलेली पावलं, खोल खड्ड्यात जातात.
अॅपल आयफोन फोरमध्ये 1GHz सिंगल कोअर कोर्टेक्स ए8 सीपीयू आहे, पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 512 एमबी रॅम देण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.